... आज बाबा इथे असायला हवे होते - मोहम्मद सिराज - Brisbane test siraj news
🎬 Watch Now: Feature Video
कसोटी कारकिर्दीत एका डावात पहिल्यांदा ५ बळी घेतल्यानंतर मोहम्मद सिराज भावूक झाला आहे. आजची कामगिरी पाहण्यासाठी माझे बाबा इथे असायला हवे होते, असे सिराजने सांगितले. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराजने आपली प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात सिराजने ७३ धावा देऊन ५ बळी घेतले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटी सुरू आहे. या कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला ३२८ धावांची आवश्यकता आहे.