वरुण धवनने श्रद्धासाठी खरेदी केलं खास गिफ्ट - street dancer latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी 'स्ट्रीट डान्सर ३ डी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम विविध ठिकाणी जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अलिकडेच श्रद्धा आणि वरुणला चंदीगढच्या विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी वरुणने श्रद्धासाठी विमानतळावरूनच एक खास गिफ्ट खरेदी केलं. श्रद्धाने या गिफ्टचा फोटो आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये शेअर करून वरुणचे आभार मानले.