"मोठा दिपस्तंभ मराठी रंगभूमीला पोरक करून गेला" - Satish Aalekarlatest news
🎬 Watch Now: Feature Video
नटाने जगावे कसे, मिळालेल्या संपत्तीचा योग्य वापर कसा करावा हे डॉक्टर श्रीराम लागू यांच्याकडून शिकावं, असे सतीश आळेकर यांनी म्हटलंय. डॉ. लागू यांच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आळेकर आले होते. ते पुढे म्हणाले, शेकडो वर्षांपूर्वीचा वृक्षाप्रमाणे डॉ. श्रीराम लागू यांच्यात अभिनयाच्या छटा मराठी रंगभूमीवर रुळल्या होत्या.. कलेच्या प्रांतात काम करत असताना यापेक्षा अजून काय चांगलं असा प्रश्न विचारल्यावर आपल्या डोळ्यासमोर बालगंधर्व गडकरी असे महत्वाचे व्यक्तिमत्व समोर येतात. अगदी त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपला धारदार आवाज, विचारांची स्पष्टता, बोलके डोळे, रेखीव हावभाव अशा अनेक गोष्टींसाठी मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध नट म्हणून आजतागायत महत्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली..
"नटाने कसे जगावे","मिळालेल्या संपत्तीचा वापर योग्य रितीने कसा करावा", हे कोणाकडून शिकावं तर ते डॉ. श्रीराम लागू यांच्याकडून...! महत्त्वाचं म्हणजे त्यांचे वडील हे गांधीविचारांचे असल्यामुळे अगदी लहानपणापासून सामाजिक कार्याचे धडे त्यांना मिळालेले असल्याने उत्तम social worker म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काम पाहिले अस म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही... सरकारी दरबारा पासून चार हात नेहमी लांबच राहिले असले तरीदेखील आणीबाणीच्या प्रसंगी न पटणाऱ्या विचारांना नेहमीच धाडसाने विरोध केला...