नो टाईम टू डाय प्रीमियर : जेम्स बाँडने लक्ष वेधले, रेड कार्पेटवर अवतरले राजघराणे - डॅनियल क्रेगचा शेवटचा सिनेमा
🎬 Watch Now: Feature Video
जेम्स बाँडचा बहुप्रतीक्षित नो टाईम टू डायचा प्रीमियर मंगळवारी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॅनियल क्रेग, ली सेडॉक्स आणि नो टाईम टू डायच्या कलाकारांसह ब्रिटनचे राजघराण्यातील सदस्य रेड कार्पेटवर सामील झाले. जेम्स बाँडचा बहुप्रतीक्षित नो टाईम टू डायचा प्रीमियर मंगळवारी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॅनियल क्रेग, ली सेडॉक्स आणि नो टाईम टू डायच्या कलाकारांसह ब्रिटनचे राजघराण्यातील सदस्य रेड कार्पेटवर सामील झाले. कोरोना महामारीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. प्रिन्स चार्ल्स, त्याची पत्नी कॅमिला, प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट द डचेस ऑफ केंब्रिज प्रीमिअरमध्ये उपस्थित असल्याचे दुर्मिळ दृष्य पाहायला मिळाले. केट द डचेस ऑफ केंब्रिज यांनी सोनेरी केप ड्रेस परिधान करुन संपू्र्ण शोचे लक्ष वेधून घेतले होते. खलनायक सफिन म्हणून जेम्स बाँड फ्रँचायझीमध्ये सामील झालेला अभिनेता रामी मलेक याने राजघराण्यातील सदस्यांची भेट घेतली. त्याच्यासोबत पहिल्या ब्लॅक महिला एजंट नोमीची भूमिका साकारणारी लशाना लिंच आणि मनीपेनी म्हणून परतलेली नाओमी हॅरिस उपस्थित होते. दीर्घकाळ चालणाऱ्या जेम्स बाँड मालिकेतील 25 वा चित्रपट असलेला नो टाईम टू डाय हा चित्रपट अभिनेता डॅनियल क्रेगचा अखेरचा चित्रपट असेल. हा चित्रपट सुरुवातीला एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे याचे जगभर प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते. मंगळवारी याचा प्रीमियर पार पडल्यानंतर याच्या जगभर प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.