कुशल बद्रिकेचं कुटुंबीयांसोबत 'कोरोना गो' सॉन्ग - कुशल बद्रिके
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतल्यास कोरोनापासून बचाव करता येतो, असे संदेश कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. त्यासाठी काही हटके फंडे देखील कलाकार वापरताना दिसत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी कोणी कविता, कोणी गाणी तयार करत आहेत. 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिके सध्या आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहे. आपल्या कुटुंबासोबत त्याने कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी 'कोरोना गो' हे गाणे तयार केले आहे. 'ओ वुमनिया' या गाण्याच्या चालीवरील या गाण्यातून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.