कनिका कपूर लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल - Kanika Kapoor latets news
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - 'बेबी डॉल' गाण्याची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिला लखनऊ येथील केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी ती लंडन वरून भारतात परतली होती. भारतात येण्यापूर्वी ती लंडन येथे काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही सध्या तपासणी करण्यात येत आहे. कनिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.