Exclusive Interview: 'द फॉरगॉटन आर्मी' सीरिजबद्दल कबीर खानने उलगडले खास किस्से - कबीर खान ईटीवी भारत मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दिग्दर्शक कबीर खान यांची आगामी 'द फॉरगॉटन आर्मी' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ जानेवारीला ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज सुभाष चंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सैनिकांचा त्याग, त्यांच्या शौर्यगाथेची झलक पाहायला मिळाली. या सीरिजबाबत कबीर खानने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.