'दिलबर' गाण्याने गाठला १ अब्जचा आकडा, नोरा फतेहीने रचला इतिहास - नोरा फतेहीचे दिलबर गाणे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10892446-1017-10892446-1615009535134.jpg)
मोरक्कन अभिनेत्री नोरा फतेही हिच्या गाण्याने नवा इतिहास रचला आहे. 'दिलबर' या गाण्याने यूट्यूबवर १ अब्जच्या आकड्यांना स्पर्श केला आहे. हा पराक्रम गाजवणारी नोरा ही पहिली अफ्रीकी महिला कलाकार आहे. यासाठी टी सिरीजच्या कार्यालयात टीमने तिच्यासाठी एक सरप्राईजची योजना आखली होती. तिच्या करियरला कलाटणी देणाऱ्या या 'दिलबर' गाण्यामुळे नोराचे आयुष्य बदलले आहे. तिने 'सत्यमेव जयते' या चित्रपटातही एक डान्स केला होता. गर्मी, ओ साकी साकी, एक तो कम जिंदगानी यासारख्या गाण्यांमुळे ती बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. नोरा आगामी 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे.