बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर बायोपिक बनवण्याची इच्छा - अश्विनी अय्यर तिवारी - Ashwini on making Kangana's biopic
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - अश्विनी अय्यर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'पंगा' चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एका महिला कबड्डी खेळाडूवर आधारित या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेत्री कंगना रनौत यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या यशाबाबत अश्विनी अय्यर तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. या चित्रपटानंतर आता कंगनाच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.