"मला 'भारता'च्या नावाने ओळखले जावे हे 'स्वप्न होते" - Former Miss Universe Lara Dutta
🎬 Watch Now: Feature Video
मिस युनिव्हर्सच्या मंचावर जेव्हा तुझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा काय भावना होत्या, असा प्रश्न हरनाझ संधूला विचारण्यात आला तेव्हा तिने दिलेले उत्तर फारच सुंदर आहे. यावर ती म्हणाली, "पहिल्यांदा माझे नाहीतर माझ्या देशाचे नाव पुकारले जात होते, हा माझ्यासाठी अभिमानास्पद असा क्षण होता. गेल्या कित्येक दिवसांपासून याची वाट मी पाहत होते, की सर्वजण मला इंडियाच्या नावाने ओळखतील. जेव्हा पुढील मिस युनिव्हर्स भारताची आहे, असे म्हटलं गेलं तेव्हा मला खुप गर्व वाटला. मला रडू कोसळले. हा क्षण संपूर्ण देश पाहत होता. देशवासीयांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठींब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते."
माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यापासून काय प्रेरणा घेतल्या? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, ''त्या दोन्ही सुंदर असून, त्यांची वृत्ती अत्यंत नम्र होती. त्यांनी स्वतःला प्रोफेशनली खूप चांगल्या पध्दतीने हातळले. हे आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. मलाही तसेच व्हायचे आहे. त्यांनी कालच मिस युनिव्हर्स जिंकल्यासारखे वाटते.''
Last Updated : Dec 26, 2021, 3:34 AM IST