हरनाझ संधूच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव, जंगी स्वागताची तयारी - विश्वसुंदरी हरनाझ
🎬 Watch Now: Feature Video

मिस युनिव्हर्स हरनाझ संधूला जागतिक किताब मिळाल्यानंतर तिच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. संपूर्ण पंजाबला तर आनंद झालाच आहे पण देशातून आणि विदेशातूनही अभिनंदन होत असल्याचे तिचा भाऊ हरनूर संधूने सांगितले. आमचे प्रतिनिधी जेव्हा हरनाझच्या घरी माहिती घेण्यासाठी पोहोचले तेव्हा घरी अभिनंदन करणाऱ्यांची खूप गर्दी होती. हरनाझच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलसह इतर प्राध्यापक घरी अभिनंदनासाठी पोहोचले होते. हरनाझ अद्याप घरी पोहोचलेली नाही. परंतु ती जेव्हा येईल तेव्हा मोठे स्वागत केले जाणार असल्याचे भाऊ हरनूर संधूने सांगितले.