परमबीर सिंग यांचे पाचही गुन्हे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिल्याने आश्चर्य- शंभूराजे देसाई
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( SC order on Param Bir Singh ) यांच्यावर असलेल्या पाचही गुन्ह्यांचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे. याबाबत आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई ( Shabhuraje Desai on SC order ) म्हणाले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पाचही गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे का ( Param Bir Singh case handover ) दिला? याबाबत सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर अद्याप मिळालेली नाही. त्या ऑर्डरचा सर्वोच्च अभ्यास केला जाईल. तसेच आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर असल्याचेही शंभूराजे देसाई यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST