VIDEO : धावत्या रेल्वेखाली सापडले साधूबाबा, आश्चर्यकारकरित्या बचावले.. पाहा हा थरारक व्हिडिओ.. - साधू बाबा रेल्वे खाली नाशिक
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - धावती रेल्वे सोडताना एक साधूबाबा ( Sadhu baba under train Manmad ) थेट रेल्वे रुळाच्या मधोमध पडल्याची थरारक घटना घडली आहे. साधूबाबा ठार होतील, असे बघ्यांना वाटत होते, मात्र साधूबाबा यातून सुखरूप बचावले. रेल्वे रुळावर मधोमध पडलेल्या साधुबाबांना स्थानकावरील प्रवाशांनी हालचाल न करता त्याच स्थितीत पडून राहण्याचा सल्ला दिला. साकेत एक्स्प्रेसच्या तब्बल ६ ते ७ रेल्वेच्या बोगी साधूबाबांच्या अंगावरून गेल्या. त्यानंतर एक्स्प्रेस थांबली. यातून साधूबाबा सुखरूप बचावले. हा सर्व थरार 11 एप्रिलला दुपारच्या सुमारास नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकावर घडला. स्थानकावरील खाद्य पदार्थ विक्रेत्याने आपल्या मोबाईलमध्ये हा थरार कैद केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST