Indian Man Struggle : भारतीय नागरिकाचा युक्रेनीयन पत्नीला भारतात आणण्यासाठीचा संघर्ष, पाहा VIDEO - ल्वीव्ह येथे निर्वासीत भारतीयांचे शहर
🎬 Watch Now: Feature Video
ल्वीव्ह (युक्रेन) Lviv (Ukraine) : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पोलंड सीमेपासून 60 किमी अंतरावरील ल्विव्ह हे निर्वासितांचे शहर बनले ( Lviv has become a city of refugees ) आहे. त्यांच्या पाळीव प्राणी किंवा जीवनावश्यक वस्तूंशिवाय काहीही न बाळगता, युद्धग्रस्त देशातून पळून जाताना हजारो लोक दररोज ल्विव्हला ( Russian invasion of Ukraine ) पोहोचतात. त्यापैकी गगन मोगा या भारतीय नागरिकाने युक्रेनियन महिलेशी लग्न केले ( Indian Man Struggle For Pregnant Wife ) आहे. त्याच्याकडे भारतात परतण्याचा पर्याय असला तरी, तो आपल्या गर्भवती पत्नीला एकटे सोडू इच्छित नाही आहे. यादरम्यान, त्याच्यावर कश्याप्रमाणे परिस्थिती ओठावली होती हे त्यांने सांगितले आहे. "मी एक भारतीय नागरिक आहे, मी भारतात जाऊ शकतो पण माझी पत्नी, जी युक्रेनियन आहे, ती जाऊ शकत नाही. मला सांगण्यात आले आहे की फक्त भारतीयांना बाहेर काढले जाईल. मी माझ्या कुटुंबाला येथे सोडू शकत नाही. माझी पत्नी 8 महिन्यांची गर्भवती आहे. आम्ही पोलंडला जाणार आहोत. आम्ही सध्या ल्विव्हमध्ये एका मित्राच्या ठिकाणी आहोत, "कीवमधून पळून गेलेल्या गगन मोगाने सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST