Rupali Chakankar Statement on Hijab : न्याय देवतेने जो काही निर्णय दिला, त्याचा आम्ही स्वीकार करतो - रुपाली चाकणकर - State Women's Commission Chairperson Rupali Chakankar
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ( Karnataka High Court decision on hijab case ) निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( State Women's Commission Chairperson Rupali Chakankar ) यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाले की, न्याय देवतेने जो काही निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो, असं मत यावेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST