Sanjay Raut Press Conference : आज महाराष्ट्र बोलेल आणि देश ऐकणार.. पुण्यातील शिवसैनिक मुंबईकडे रवाना.. - पुण्यातील शिवसैनिक मुंबईकडे रवाना
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान देत शड्डू ठोकला आहे. पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत ( Ex HM Anil Deshmukh ) असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशाराही त्यांनी काल दिला आहे. त्यानंतर आज शिवसेना भवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार ( Sanjay Raut Press Conference ) आहेत. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत राऊत कोणते नवे खुलासे करणार? भाजपाचे साडेतीन लोक कोण? त्यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलणार? या सगळ्याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागून असताना, राज्यभरातील शिवसैनिक देखील मुंबईकडे रवाना झालेल्या पाहायला मिळत ( Shiv Sainik from Pune leaves for Mumbai ) आहेत. पुणे शहरातील शिवसैनिक हेदेखील मुंबईकडे रवाना झाले असून, आज महाराष्ट्र बोलेल आणि देश एकेल अशी प्रतिक्रिया या शिवसैनिकांनी व्यक्त केलीये. पुण्यातील शिवसेना पदाधिकार्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने..
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST