Uncut PM Modi : पूर्वी भूमीपूजन व्हायची, उद्घाटनांचा पत्ता नव्हता; पंतप्रधानांचा मेट्रो उद्घाटन प्रसंगी टोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विरोधकांवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पूर्वी भूमीपूजन व्हायची, मात्र उद्घाटनांचा पत्ता नव्हता, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ( Pune Metro Project Inaugration PM Modi ) यानंतर एमआयटी कॉलेज येथे आयोजित जनसभेत ते बोलत होते. ( PM Modi on Pune Visit ) ते म्हणाले, 2014 पर्यंत दिल्ली एनसीआर मध्येच मेट्रो होती. आज देशातील दोन डझनहून अधिक शहरांत मेट्रो सुरू होत आहे. यात महाराष्ट्रातील हिस्सा अधिक आहे. राज्यात मेट्रोचा विस्तार होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी मेट्रोतून प्रवास करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक शहर सर्वच क्षेत्रात अग्रेसर व्हावं यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. रेरा कायदा मध्यवर्गीयांसाठी फायदेशीर ठरत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST