Yuva Sena Protest PFI Pune : पुण्यामध्ये PFI विरोधात युवासेना आक्रमक; पाकिस्तानी झेंडा फाडत आंदोलन - Agitation on Behalf of Yuva Sena at Pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुण्यासह राज्यभरात एनआयएने छापेमारी करीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली ( NIA Conducted Raids on PFI ) आहे. याच्या निषेधार्थ काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन ( PFI Supporters Protested at Pune Collectorate ) करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ( Yuva Sena Aggressive Protest ) करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात ( Agitation on Behalf of Yuva Sena at Pune ) आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. याच्या विरोधात आज युवा सेनेच्या वतीने ज्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली त्याच ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आल आहे. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत तो झेंडा फाडण्यात आला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी आणावी, तसेच ज्यांनी कोणी अशा पद्धतीचे घोषणा केलेली आहे, त्यांच्यावर लवकरात लवकर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अन्यथा युवा सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST