'त्यांच्या' डोक्यात हा गोळा बसावा, रोहित पवारांचे गोळाफेकीदरम्यान मिश्किल वक्तव्य, पहा व्हिडिओ - जिंतूर सेलू विधानसभा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/26-11-2023/640-480-20115999-thumbnail-16x9-yuva-sangrsha-yatra.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Nov 26, 2023, 9:42 AM IST
पुणे Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. युवकांचे विविध प्रश्न मांडण्यात यावेत आणि सरकारनं याची दखल घ्यावी, यासाठी ही यात्रा आमदार रोहित पवारांनी काढलीय. या यात्रेत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील ह देखील सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी युवकांशी निगडीत प्रश्न ऐकून घेत ही संघर्ष यात्रा चालू आहे. शनिवारी परभणी जिल्ह्यात या यात्रेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांकडून या दोघांनी गोळाफेक कशी करायची याचे रोहित पवार यांनी धडे घेतले आहेत. परभणी जिल्ह्यातील चारठाना येथून युवा संघर्ष यात्रेच्या 11 व्या दिवसाला सुरुवात झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवांकडून गोळाफेकीचे धडे घेतले. तसंच यावेळी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळेदेखील उपस्थित होते. जे युवांच्या हिताचा निर्णय घेत नाहीत, अशांच्या डोक्यात हा गोळा बसावा, असं यावेळी आमदार रोहित पवार यांनी बोलताच एकच हशा पिकला.