Election Card On Sell : 'मतदान कार्ड विकणे आहे'..अकोल्यातील या युवकाने चक्क मतदान कार्ड विक्रीला काढलं!, पहा व्हिडिओ - युवकाने मतदान कार्ड विक्रीला काढलं
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/03-07-2023/640-480-18905951-thumbnail-16x9-akola.jpg)
अकोला - नेत्यांचे सततचे पक्षांतर आणि सत्तेत सामील होण्यासाठी काहीही करण्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळली असल्याचे चित्र अकोल्यातील एका व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे. राज्यातील राजकीय समीकरणे क्षणोक्षणी बदलत असल्याने मतदारांचा कोणत्याच पक्षावर विश्वास राहिला नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत मतदान करायचे की नाही, असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. यावरून सोशल मीडियावर देखील अनेक जोक व्हायरल होत आहेत. आता अकोल्यातील एका युवकाने चक्क मतदान कार्ड विक्रीला काढलं आहे. या युवकाने आपल्या टी शर्टवर 'मतदान कार्ड विकणे आहे' असा मजकूर लिहिला आहे. हा युवक शहरातील बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. युवकाची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही.