Jalna Crime News: धक्कादायक! जालन्यात रामनवमीच्या मिरवणुकीत वादातून तरुणाचा खून - उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू
🎬 Watch Now: Feature Video
जालना : रामनवमीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. विष्णू उर्फ विक्की राम सुपारकर (रा. जुना जालना) असे मृताचे नाव आहे. त्याचा काही तरूणांना बरोबर नाचण्याच्या कारणांमुळे वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. दुसऱ्या तरुणाने चाकूने त्याच्या छातीवर वार केले. त्यामुळे रक्तस्त्राव जास्त झाला. या जखमी तरूणाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला नंतर मृत घोषीत केले. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच रुग्णालय गाठले. नातेवाईक आणि मित्र परिवार एकत्र आले. त्यांनी आरोपी तरूणांना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिसांना धारेवर धरले. पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. यावेळी दवाखान्यात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील भेट देली. मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. वादामधून मारामारी झाली, त्यात एका तरूणाचा जीव गेला. आरोपी ताब्यात आहेत, पोलीस पुढील कारवाई करतील असे खोतकर यांनी सांगितले. पोलिसांना आरोपींना अटक करण्याच्या सुचना दिल्या आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांनी दोन आरोपी पकडल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली. रात्री उशिरापर्यंत जमाव समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.