Video : 'यमन रंग' मैफलीतून उलगडले यमन रागाचे पैलू !

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
'यमन रंग' गान मैफलीतून (Yaman Rang Singing Program) गायिका सानिया पाटणकर (Singer Saniya Patankar) यांनी धृपद,खयाल,तराना,सरगम,भावगीत,चित्रपट गीत,भजन,नाट्यगीत,गझल यातून वेध घेतला. यामाध्यमातुन यमन रागाचे अनेक पैलू उलगडले गेले !पुणे (Pune) येथे (Bharatiya Vidya Bhavan) भारतीय विद्या भवन आणि (Infosys Foundation) इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' यमनरंग ' या गानमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. धृपद गायनाने मैफलीची सुरुवात झाली. प्रसिद्ध खयाल 'सखी येरी आली पिया बीन', यमन रागातील भक्ती संगीत बरोबरच अनेक भक्ती संगीत सादर करण्यात आले. त्यानंतर नाट्यसंगीत 'देवा घराचे ज्ञात कुणाला', 'नाथ हा माझा', 'राधा धर मधु मिलींद', गझल 'रंजीश सही' , 'सलो ना सा सजन है', 'आज जाने की जिद ना करो' या गाण्यांनाही प्रतिसाद मिळाला. मराठी आणि हिंदी चित्रपट गीते देखील सादर करण्यात आली. ही मैफल प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर आणि त्यांचे शिष्य यांनी सादर केली. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३१ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.