world tour पैसे मागून विश्वभ्रमण; विदेशी युवक बनतोय ठाणेकरांच्या चर्चेचा विषय
🎬 Watch Now: Feature Video
ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॅडबरी सिग्नल Cadbury signal येथे एका विदेशी युवकाला उभे असलेले पाहून तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले याला कारण आहे. या युवकाच्या हातात असलेली हिंदी मजकुरात लिहिलेली पाटी. मुझे मदत चाहिये, मुझे पैसे चाहिये धन्यवाद. असे मत हिंदीतील मजकूर या पाठीवर लिहिलेला असून ही पाटी हातात घेऊन हा तरुण कॅडबरी सिग्नल येथे उभा राहून सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. महत्त्वाचे म्हणजे हा युवक विश्व भ्रमण करण्यासाठी निघालेला असून ज्या राज्यात अथवा शहरात तो पोहोचतो तिथे जेवण आणि पुढच्या प्रवासासाठी हा अशाच प्रकारे उभा राहून नागरिकांकडून पैसे गोळा करतो व लोकही त्याला मोठ्या मनाने पैसे देऊन त्याची मदत करत आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक पत्रकार मित्र विश्वभ्रमणासाठी गेला व आठ महिन्यानंतर परतला होता. त्याने देखील अशाच प्रकारे नागरिकांकडून आर्थिक मदत घेऊन विश्वभ्रमण केले होते. कॅडबरी सिग्नल वर हातात पाटी घेऊन उभे असलेले या व्यक्तीबद्दल फारशी कुणाला काहीच माहिती नसल्याने सध्या तरी तो ठाणेकरांच्या कुतूलाचा विषय बनलेला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST