Wild Elephant Video : खाण्याच्या शोधात जंगली हत्तीचा गावात धुमाकूळ, पिकांची केली नासधूस; पहा व्हिडिओ - जंगली हत्ती
🎬 Watch Now: Feature Video
चामराजनगर, कर्नाटक - कर्नाटकच्या इरोड जिल्ह्यातील चामराजनगर सीमेजवळील गावात जंगली हत्तीने घुसून कहर केल्याची घटना समोर आली आहे. खाण्याच्या शोधात अचानक गावात घुसलेला हत्ती पाहून लोक कावरेबावरे झाले. अनेक जण घाबरून इकडे - तिकडे पळत सुटले. जंगली हत्तीने शेतात घुसून ऊस आणि केळीच्या पिकांची नासधूस केली. तसेच त्याने इतर अनेक गोष्टींचा नाश केला. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये हत्तीचा व्हिडिओ घेतला. ही बाब कळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हत्तीचा जंगलाच्या दिशेने पाठलाग केला. या परिसरातील राष्ट्रीय महामार्गाला आधीपासूनच हत्तींचा धोका आहे. मात्र आता गावालाही असलेला हत्तींचा धोका पाहून असनूरच्या आसपासच्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. पहा हा व्हिडिओ