Vedanta Foxconn project : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर आदित्य ठाकरेंच्या आंदोलनानंतर स्थानिकांशी केलेली बातचीत; पाहा व्हिडिओ - Vedanta Foxconn Project in Maval Area
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राज्यात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प ( Vedanta Foxconn Semiconductor Project ) गुजरातला गेल्यानंतर राज्यात यावर चांगलेच राजकारण तापले आहे. प्रामुख्याने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Movement on Vedanta Foxconn Project ) या विरोधामध्ये सातत्याने आंदोलन ( Yuva Sena Chief Aditya Thackeray ) करीत होते. आज त्यांनी हा प्रकल्प ज्या भागात होणार आहे, तेथेही आंदोलन केले. मात्र, तेथील स्थानिक नागरिकांना नेमके काय वाटतेय त्यांच्या नेमक्या भावना काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ई-टीव्हीशी बोलताना स्थानिकांनी ( Vedanta Foxconn Project in Maval Area ) त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सरकारने पाच वर्षे झाले सातबारावर शिक्के मारूनही मोबदला नाही. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी ( Vedanta Foxconn Project ) सरकारने मावळ भागामध्ये पाच वर्षांपूर्वीच इथल्या शेत जमिनीवरती काही शासकीय शिक्के मारले. त्यामुळे त्याचा मोबदलासुद्धा आम्हाला लवकर भेटला नाही. त्याचबरोबर आता आम्हाला पहिला हप्ता भेटला होता. आता तर तो प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आता तर काही प्रश्न उभा टाकलेले आहेत. जे आमचे तसे नुकसान होतच आहे कारण आमचे लोन पास होत नाही. आम्हाला शेती करता येत नाही. अशा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकार बदलल्यामुळे प्रकल्प प्रकल्प गेला, हे बघण्यापेक्षा हा प्रकल्प बाहेर राज्यात का गेला हे याचा अभ्यास करावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST