Thane : नवीन ठाणे रेल्वे स्थानक कधी होणार ? दोन दशकांपासून प्रतीक्षा - नवीन ठाणे रेल्वे स्थानक कधी होणार
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17066063-thumbnail-3x2-thane.jpg)
ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानका दरम्यान ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक (New Thane Railway Station) उभारण्यात येणार असून, या स्थानकाच्या आराखड्यास रेल्वे विभागाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. रेल्वे हद्दीतील कामे रेल्वे विभागामार्फत तर इतर कामे महापालिका करणार असून या संपूर्ण प्रकल्पाचे काम स्मार्ट सिटी योजनेतून होणार आहे. त्याचबरोबर नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशा कामांची निविदा महापालिकेने यापूर्वीच काढली आहे. त्यापैकी रस्त्यांची कामेही सुरू केलेली आहेत. तरीही हा प्रकल्प अजूनही कागदावरचं असल्याचे चित्र आहे. नव्या स्थानकाचे घोडे नेमके अडले कुठे, असा सवाल त्यामुळे ठाणेकर रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST