Mumbai Section 144 : मुंबईत कलम 144 लागू असल्याची अफवा पसरवू नका - विश्वास नांगरे पाटील - कलम 144 लागू अफवा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत सीआरपीसीचे कलम १४४ लागू असल्याची अफवा आहे. ही माहिती नागरिकांसाठी खोटे आणि गोंधळ निर्माण करणारी आहे. मुंंबई पोलिसांकडून दर 15 दिवसांनी आदेश काढला जातो. बेकायदेशीरपणे मोर्चे काढून शहरातील शांतता बिघडवू इच्छिणार्यांना याद्वारे सल्ला दिला जातो. या आदेशाचे दैनंदिन जीवनासोबत काहीही संबंध नसल्याचे मुंबईचे पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील Vishwas Nangre Patil Joint Commissioner of Police यांनी सांगितले. त्यांनी आवाहन केले आहे की, मुंबईत शहरात कलम 144 लागू केल्या असल्याच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. माध्यमांनी देखील संभ्रम निर्माण करू नये, असे देखील त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST