Video : दारुच्या नशेत तरुण चढला टॉवरवर, माहेरहून बायको आणण्याची केली शोलेस्टाईल मागणी - Virugiri By Climbing Mobile Tower
🎬 Watch Now: Feature Video
जालना : दारूच्या नशेत एक तरुण 4 वाजेच्या सुमारास गावातीलच मोबाईल टाॅवरवर चढला. गावातील लोकांना त्याने मला घरकुल ( House And Wife ) पाहिजे. माझी बायको मला सोडुन माहेरी गेले आहे. तिला माझ्याकडे परत आणा. या मागणीसाठी एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकला आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना ( Badnapur Dabhadi incident ) घडली आहे. गणपत बकाल असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाने 4 तास दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर ( Mobile Tower ) मुक्काम ठोकल्याने घटनास्थळी जमा झालेल्या नागरीकांमध्ये घबराट पसरली होती. सर्व यंत्रणांनी प्रयत्न करूनही हा तरुण खाली आला नाही. अखेर स्वतःहून 4 तासानंतर तो टॉवरवरून खाली आल्याने उपस्थित नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.गावकऱ्यांनी त्याला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले. पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. मात्र पोलिसांकडूनही तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्नीशमन दलाचे पथक मागविण्यात आले. मात्र तेही त्याच्यासमोर हतबल झाले. गणपत हा दारूच्या नशेत असल्यानं अनेकांनी त्याची मजा घेतली. "तुला आमदार करतो, खाली उतर" अशी गळ घातली. पण तरीही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही. पण तब्बल 4 तासाने तो टॉवर खाली उतरला. त्यांनतर बदनापूर पोलिसांनी ( Badnapur Police ) त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST