Viral Video : दोन पोलिसात वसुलीच्या पैशांवरून जोरदार राडा, मारामारीचा व्हिडिओ व्हायरल - एसपी अशोक मिश्रा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 18, 2023, 7:42 PM IST
नालंदा : बिहारमधील नालंदामध्ये वसुलीच्या पैशांवरून दोन पोलिसात जोरदार राडा झालाय. दोघांनी परस्पर संगनमतानं वसुली केली होती. दरम्यान, पैशाच्या वाटणीवरून दोघांमध्ये रस्त्याच्या मधोमध मारामारी झाली. रस्त्यानं चालणाऱ्या नागरिकांनी त्यांचा दोघांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवून व्हायरल केलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघांनी रस्त्याच्या मधोमध एकमेकांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. राहुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोहसराय हॉल्टजवळ ही घटना घडली. या मारामारीचा व्हिडिओ एसपींपर्यंत पोहोचताच त्यांनी दोघांवर कारवाई केलीय. नालंदा येथील 112 आपत्कालीन सेवेत तैनात असलेल्या दोन पोलिसांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ एसपी अशोक मिश्रा यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं त्याच्यावर कारवाई केली. बेकायदेशीररीत्या वसूल केलेल्या पैशाच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला. सध्या दोघांची नावे स्पष्ट झालेली नाहीत.