Viral Video: बेंगळुरूमध्ये महिला प्रवाशाच्या हिंदी बोलण्यावरून ऑटो चालकाने घातला वाद, पाहा व्हिडिओ - ऑटोचालक
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक ऑटोचालक कन्नड न बोलता आल्याने, एका महिला प्रवाशावर नाराज झाल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना नुकतीच बंगळुरूमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. ऑटोमधील महिलेने चालकाला हिंदीत बोलण्यास सांगितले. यावर ते संतापले आणि म्हणाले की, 'मी स्थानिक भाषेऐवजी हिंदीत का बोलू?' ऑटोचालकाला विरोध करत महिलेने तिला कन्नड भाषा येत नसल्याचे सांगितले. तेव्हा ड्रायव्हर म्हणाला ही कर्नाटक आमची जमीन आहे. तुम्ही कन्नड बोलले पाहिजे. मी हिंदी का बोलू? यामुळे महिला ऑटोमधून खाली उतरली. ही घटना एका सहप्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये टिपली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आले.