Video : मु्ंबईत मार्बल भरलेल्या ट्रकची खांबाला धडक; अग्निशमन दलाकडून दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर तिघांची सुटका - Fire Brigade
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुंबईत २५ टन मार्बलने भरलेला ट्रक ( Truck Loaded with Marble ) दिशादर्शक नामफलकाच्या खांबावर ( Hit a Pole of a Signpost ) आदळला. ट्रक चालकासह तिघेजण आत अडकले. अग्निशमन दल ( Fire Brigade ) ना हरकत विभागाच्या 2 तासांच्या परिश्रमाने त्यांना बाहेर काढण्यात आले. एचपी पेट्रोल पंपाची दिशा दर्शवणाऱ्या खांबाला झालेली ट्रकची धडक एवढी भीषण होती की, ट्रकचालक आत अडकला. या घटनेची माहिती कापूरवाडी पोलीस ठाण्यात कळताच वाहतूक विभाग, पोलीस ठाणे, ना हरकत विभाग, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. २ तासांच्या अथक परिश्रमानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या ३ जणांना कसेबसे सुखरूप बाहेर काढण्यात आले. ट्रक चालकाला काही दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते पोलीस ठाण्याच्या वागळे इस्टेटकडे जात होते. घोडबंदरकडून येत असताना, ट्रकचालकाचा तोल बिघडला आणि दिशा दाखवणाऱ्या फलकाच्या खांबाला धडकला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST