UPSC result 2022 : भाजीपाला विक्री करून वडिलांचा पाहिला संघर्ष, लोकसेवा आयोगात जिद्दीने मिळविले यश
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भाजीविक्रेत्याच्या मुलाने यश मिळविले आहे. या परीक्षेत पुण्यातील खराडी येथे राहणारा सिद्धार्थ भांगे याने देखील यश मिळविले आहे. त्याने परीक्षेत 700 वा क्रमांक पटकावला आहे. सिद्धार्थ भांगे हा पुण्यातील खराडी येथे राहणार आहे. त्याचे शिक्षण पुण्यातच झाले आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश मिळविले आहे. सिद्धार्थ हा मूळचा लातूरचा आहे. त्याचे घरचे 1970 मध्ये पुण्यात आले. भांगे कुंटुंबीय हे ताडीवाला रोड येथील बस्तीत राहू लागले. त्याचे वडील रिक्षा चालवू लागले. जेव्हा परिस्थितीती चांगली झाली तेव्हा त्यांनी खराडी येथे घर घेतले. पण कोरोनाच्या काळात पुन्हा परिस्थिती हलाकीची झाली. त्याचे वडील भाजीपाला विक्री करू लागले. वडिलांचं संघर्ष पाहून सिद्धार्थने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यामध्ये त्याला यश मिळाले आहे. या निकालाबाबत सिद्धार्थ म्हणाला की मी जेव्हा निकाल बघितला तेव्हा मलाच विश्वास बसला नाही. पण आज आनंद होत आहे. आज जरी उत्तीर्ण झालो असलो तरी पण मी आयपीएससाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. आई वडिलांमुळे यश मिळाल्याचे सिद्धार्थने सांगितले.