साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपलं, राजवाडा चौपाटी जलमय; पाहा व्हिडिओ - Unseasonal rain warning

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 3:44 PM IST

सातारा Unseasonal Rain In Satara : सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसला. सातारा शहराला तब्बल तीन तास मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळं नागरिकांची चांगलीच दानादान उडाली होती. तसंच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं साताऱ्यातील वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. मुसळधार पावसामुळं बेसमेंटच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं. सातारा-शाहूपुरी रस्त्यावरील कोटेश्वर पाण्याच्या टाकीजवळील रस्ता खचला आहे. सोनगाव-शेंद्रे मार्गावर तसंच जकातवाडी-करंडी रस्त्यावर दोन ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे. वाई, खंडाळा तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. नाल्यांसाठी बांधलेल्या संरक्षक भिंतीही कोसळल्या आहेत. पावसामुळं सातारा शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानं अडचणीत भर पडली होती. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.