Beed News : मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन; कार्यकर्त्यांनी केले खड्ड्यालाच प्रपोज...Watch Video - खड्ड्यालाच प्रपोज केले
🎬 Watch Now: Feature Video
बीड : शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे बिडकरांना अनेक समस्याचा त्रास सहन करावा लागतो. मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्याभोवती मोठ्या रांगोळ्या काढल्या. त्यानंतर तेथे आय लव यू असे रांगोळीने लिहीत थेट खड्ड्यालाच प्रपोज केले आहे. हे आंदोलन पाहण्यासाठी बीड शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर या कार्यकर्त्याचा नादच खुळा म्हणायला हरकत नाही. कारण बीड शहरात असलेले अंतर्गत रस्ते हे नगरपालिकेअंतर्गत येतात. याच खराब रस्त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. लोक या खड्ड्यातून ये जा करतात. याचा त्रास वाहन चालकांना देखील सहन करावा लागतो. त्यामुळे बीड नगरपालिकेने येणाऱ्या काळात हे खड्डे जर नाही बुजवले तर नगरपालिका फोडू असे आव्हान, मनसे कार्यकर्त्यांनी केले आहे. या सर्व गोष्टीला नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.