MP Kapil Patil helps injured driver : केंद्रीय राज्यमंत्र्यांनी वाहनांचा ताफा थांबवत अपघातग्रस्त वाहनचालकाला केले रुग्णालयात दाखल - latest news from Thane
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील MP Kapil Patil helps injured driver यांना विधानसभा दौऱ्यावर जाताना अपघातग्रस्त वाहन दिसले. राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तातडीने त्यांच्या वाहनाचा ताफा थांबविला आणि अपघातातील जखमींना मदत MP Kapil Patil helps injured driver करत त्यांना स्वत:च्या वाहनात बसवून मुरबाड येथील रुग्णालयात दाखल Kapil Patil admitted accidental driver to hospital केले. राज्यमंत्री कपिल पाटील आज दुपारच्या सुमारास विधानसभा दौऱ्यावर जात असताना कल्याण नगर राष्ट्रीय मार्गावरील बापसई गावाच्या हद्दीत त्यांना गॅस सिलेंडरने भरललेल्या टेम्पोला अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ आपले वाहन थांबवून जखमींना मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेले टेम्पोचालक सोमनाथ गवाळे यांना ताफ्यातील एका वाहनात बसवून मुरबाड येथील रुग्णालयात दाखल Union Minister of State Kapil Patil केले. तसेच डॉक्टरांना अद्ययावत उपचार करण्याची सूचना दिला. कपिल पाटील यांनी जखमी सोमनाथ गवाळे यांची विचारपूस करून त्याला दिलासा दिला. दरम्यान या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST