Umbrella Fall Active: भंडारदरा धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो, अम्ब्रेला फॉल सुरू - अम्ब्रेला फॉल सक्रिय

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 5:22 PM IST

अहमदनगर Umbrella Fall Active:  भंडारदरा धरण अर्थात 'विल्सन डॅमच' नाव घेतलं की पर्यटकांच्या नजरे समोर येतो तो धरणाच्या भिंतीजवळ असलेल्या एका मोठा गोलाकार धबधबा. (Bhandardara Dam Overflow) त्याच्या छत्रीसारख्या (Bhandardara Dam) वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘अम्ब्रेला फॉल’ म्हणून ओळखलं जातं. तोच 'अम्ब्रेला फॉल' आता धरण दुसऱ्यांदा 'ओव्हर फ्लो' झाला  आहे. चला तर पाहुयात या 'अम्ब्रेला फॉल'ची मन मोहून टाकणारी दृश्यं. (Bhandardara Village)

प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर इंग्रजांनी विल्सन अर्थात 'भंडारदरा धरणा'ची निर्मिती अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि शेंडी गावाच्यामध्ये केली. भंडारदरा परिसरात अनेक नयनरम्य स्थळं आहेत. (Umbrella Fall Active) निसर्गसौंदर्यानं नटलेलं स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि त्या धरणातून पाणी सोडलं असता गोलाकार खडकामुळे छत्रीसारखा आकार घेऊन पांढरा शुभ्र कोसळणारा 'अम्ब्रेला फॉल' (Umbrella Fall Start) पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. सध्या हरीषचंद्र आणि कळसुबाईच्या डोंगर परिसरात पाऊस कोसळायला लागला.  भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू झाली की 'अम्ब्रेला फॉल'मधून पाणी सोडण्यात येतं. यंदा पावसानं हुलकावणी दिल्यानं गेल्या अनेक दिवसानंतर हा धबधबा सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच सुरू  राहिला तर काही दिवस पर्यटकांना 'अम्ब्रेला फॉल'चा आनंद घेता येईल. पाऊस कमी झाल्यास हा फॉल बंद करण्यात येईल, असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलयं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.