Ujjwal Nikam Reaction: सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही- उज्ज्वल निकम
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने राज्य सरकारला धोका नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटना पिठाकडे पाठवून एका प्रकारे राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढले आहे. एखाद्या पक्षातील दोन गट भांडत असेल तर चौकशी स्पीकरने घ्यायला पाहिजे मात्र, राज्यपालांना अधिकार नसताना देखील त्यांनी हस्तक्षेप केल्याचे निकम म्हणाले आहे. आता सरकारची पुनर्स्थापना होऊ शकत नाही. कारण तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वईच्छेने राजीनामा दिला होता. या निकालामुळे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे, असे निकम सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.