Uddhav Supporters Protest : कलंक वाद, उद्धव ठाकरे समर्थकांचे भाजप विरोधात जोरदार आंदोलन, पाहा व्हिडिओ

By

Published : Jul 12, 2023, 11:07 PM IST

thumbnail

नागपूर, उद्धव ठाकरे यांच्या 'कलंक'वादाचे तीव्र पडसाद आजही नागपुरात उमटले. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल केलेल्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आज शिवसेनेचे कार्यकर्ते देखील शहरातील रस्त्यावर उतरले होते. शहराच्या सीताबर्डी भागातील व्हेरायटी चौकात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. तर जवळच झाशी राणी चौकात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते गोळा झाल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी संपूर्ण सीताबर्डी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जनता पक्ष व युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही आज चांगलेच संतप्त झाले होते. मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने सुदैवाने काही अनर्थ घडला नाही. पहा आंदोलनाचा हा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.