Uddhav Thackeray Uncut Speech : पाहा, उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील संपूर्ण भाषण - Uddhav Thackeray Dussehra Melava Uncut Speech
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई ज्यांना काही देऊ शकलो नाही ते आज माझ्यासोबत आहे. मात्र, मी रुग्णालयात असताना ते शिवसेना सोडून आमच्याशी गद्दारी करून गेले. त्यांना मी गद्दारच म्हणणार Uddhav Thackeray called them traitors अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर Uddhav Thackeray criticizes CM Shinde केली. दसरा निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. Shivsena Dussehra Melava 2022 ही कोरडी गर्दी नाही. अंतकरण ओले असलेल्या शिवसैनिकांची गर्दी आहे. शिवतिर्थांवर भाड्याने आणलेली माणसे नाहीत. हीच ठाकरे कुटुंबाची कमाई आहे. जनतेच्या प्रेमावर अडीच वर्षे कारभार करुन दाखविला. आता 50 खोक्यांचा धोकासूर नावाचा रावण तयार झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप नेत्याच्या मुलाकडून अंकिताचा खून केला जातो, गुजरातमध्ये बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाते. त्यांचा सत्कार केला जातो. हे बघता देशात कुठे आहे महिला शक्तीचा आदर असेही ठाकरे बोलले. ईडीच्या कार्यालयात गेले की यांच्या अंगात हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात. भारताच्या बाजून लढणारा औरंगजेब मुसलमान असला तरी तो आमचा भाऊ आहे. ते मुसलमान आहेत म्हणून तुम्ही त्यांना नाकारणार का. सध्या देशातील लोकशाही जिवंत राहते की नाही, असा प्रश्न पडतोय. सर्वच पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीच्या बाजूने चालला आहे, असे सूचक उद्धव ठाकरे Uddhav Thackeray speech in Dussehra Melava 2022 यांनी केले. शेवटी दसरा मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी शिवाजी पार्क दुमदुमले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST