त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन; तब्बल एक लाख दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर, पाहा व्हिडिओ - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 9:46 PM IST

पुणे Dagdusheth Halwai Ganpati : आज 'कार्तिक पौर्णिमा' (Tripurari Purnima) आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Ganapati) मंदिराचा परिसर उजळून गेला होता. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त (Tripurari Purnima 2023) लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर प्रकाशले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Dagadusheth Halwai Ganapati Temple) सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा (Ganapati Temple) परिसर सजविण्यात आला होता. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.