Holi 2023: बोरी गदाजी येथील परंपरागत रक्तरंजीत होळी, पाहा कशी साजरी केली जाते - Traditional bloody Holi at Bori Gadaji
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ : जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात असलेल्या बोरी गदाजी येथे रंगाची नव्हे, तर रक्ताची होळी खेळली जाते. यामध्ये दोन गट एकमेकांवर रक्तस्राव होईपर्यंत दगडफेक करतात. गेल्या 50 वर्षापासून ही प्रथा आजही कायम आहे. विशेष म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक यावेळी एकत्र येऊन यामध्ये सहभागी होतात. हिंदू संस्कृतीमध्ये मराठी महिन्यानुसार दरवर्षी फाल्गून पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. यावेळी एकमेकांवर दगडफेक करून रक्ताची होळी साजरी करण्यात येते. यावेळी एकमेकांवर रक्त वाहून जाईपर्यंत दगडफेक केली जाते. अनेक वर्षांपासुनची परंपरा आजतागायत सुरू आहे. त्यामूळे बोरी गदाजी येथील गोटमार यात्रा राज्यासह परराज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावा शेजारून वाहणाऱ्या छोट्या नदीच्या काठावर श्री संत गदाजी महाराज यांचे मंदिर असून होलिका पर्वावर येथे गावकऱ्यांच्या वतीने तीन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात येते. आज गोटमार व त्यानंतर काला, पाखड पुजा होवून यात्रेच्या समारोप करण्यात येणार आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी गावकरी हुतुतु हा परंपरागत खेळ खेळतात. या खेळात शेवटी बाद होणाऱ्या त्या व्यक्तीची जिवंत प्रेतयात्रा काढली जाते, अशी परंपरा प्रसिद्ध आहे.