Rajnish Osho Sambodhi Day : आचार्य रजनीश ओशो यांचा ७० वा संबोधी दिवस; पाहा ओशो आश्रमामधील व्हिडिओ - Osho
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : आचार्य रजनीश ओशो यांचा आज ७० वा संबोधी दिवस साजरा होत आहे. या निमित्ताने जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य हे कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले असून आश्रमातील ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आत जात आहे. आज देशभरातून मोठ्या संख्येने भाविक हे पुण्यात आले असून ते आज माळ घालून आश्रमात जात आहे. यावेळी आश्रमात आत गेलेल्या भक्तांपैकी माँ ध्यान अभा जे शिमला सोल्हण येथून आचार्य रजनीश ओशो यांच्या समाधीच्या दर्शनाला आल्या आहेत. त्यांनी यावेळी आश्रमाच्या आत जाऊन संपूर्ण अनुभव यावेळी व्यक्त केला आहे.
भक्त आणि प्रशासनात वाद : गेल्या काही दिवसांपासून ओशो भक्त आणि ओशो प्रशासन यांच्यात मोठ्या प्रमाणात वादविवाद असून भक्तांना माळा घालून आतमध्ये आश्रमात प्रवेश दिला जात नाही. तसेच ओशो आश्रम प्रशासन आणि भक्त यांच्यात जागेबाबत आरोप करण्यात येत आहे. आज जगभरातील भक्तांकडून आंदोलन करण्यात येणार होते. पण ओशो प्रशासनाकडून आज भक्तांना माळ घालून आत सोडण्यात आले आहे. यावेळी भक्तांनी आत आश्रमात जाऊन समाधी स्थळाच दर्शन घेतले. यावेळी भजन कीर्तन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून आजचा ७० वा संबोधी दिवस साजरा करण्यात आले आहे. यावेळी माँ ध्यान अभा यांनी आतमध्ये जाऊन संपूर्ण ओशो आश्रमची माहिती दिली आहे. पाहूयात.