कडाक्याच्या थंडीतही जरांगेंच्या सभेला हजारो मराठा बांधवांची उपस्थिती, पाहा व्हिडिओ - जरांगेंच्या सभेला हजारो मराठा बांधवांची उपस्थिती
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 18, 2023, 1:25 PM IST
सातारा Manoj Jarange sabha : कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूरमधील सभा संपवून जरांगे-पाटील हे रात्री साडे दहाच्या सुमारास इस्लामपूर (जि. सांगली) येथे दाखल झाले. कराडमधील सभेला साडे अकरा वाजणार असतानाही मराठा बांधव मोठ्या संख्येनं शिवाजी स्टेडियमवर येत होते. तसंच या सभेसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 1 पोलीस उपअधीक्षक, 2 पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 180 पोलीस कर्मचारी, 25 होमगार्ड, 20 खासगी सुरक्षा रक्षक, 1 दंगा काबू पथक, बीडीएस पथक, श्वान पथक, 25 लाठ्या, 50 ढाली, 25 हेल्मेट, 1 गॅसगन, 64 एसएलआर, 10 इंसास, 5 कार्बाइन, 10 बंदुका, 2 पिस्टल आणि 1 एके 47 रायफल, इत्यादी साधन सामुग्रीचा बंदोबस्तात समावेश होता. दरम्यान, यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठा बांधवांच्या चहा-नाष्ट्याची स्टेडियममध्येच सोय केली होती. तसंच या सभेसाठी महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.