Railway News: रेल्वे रूळ तुटला; तरुणाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला - The Railway Accident

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 26, 2023, 10:44 PM IST

चंद्रपूर: तरुणाच्या सतर्कतेने एक मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. रेल्वे रूळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्याने लगेच रेल्वे प्रशासनाला कळवले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. 26 एप्रिलला वादळाने रेल्वेच्या हाय टेंशन तारा तुटल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली होती. यामुळे रेल्वे गाड्या तब्बल तीन तास उशिरा पोचल्या होत्या. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच चंद्रपुरात एक मोठी दुर्घटना होता होता टळली. गोंदिया-बिलासपूर मुख्य रेल्वे लाईन मार्गावरील रेल्वे रूळ तुटलेल्या अवस्थेत होता, तुटलेल्या अवस्थेतील रेल्वे रूळ त्याठिकाणी जात असताना शरफुद्दीन पठाण नावाच्या युवकाला दिसले. त्याने त्वरित ही गोष्ट बाबूपेठ रेल्वे केबिनला जाऊन स्टेशन मास्टरला सांगितली. स्टेशन मास्टरने रेल्वे कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी रेल्वे रूळ बघितल्यावर कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. यानंतर तात्काळ त्या रुळाची दुरुस्ती करीत नवा रेल्वे रूळ लावण्यात आला. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. चंद्रपूर, गोंदिया, झारखंड छत्तीसगड राज्याला जोडणारा हा महत्वाचा रेल्वे मार्ग आहे. अशावेळी येथून रेल्वे गेली असती तर चंद्रपुरात मोठी दुर्घटना घडली असती. या ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. रेल्वे रूळ हा व्यवस्थित असण्याची पाहणी करण्याची जबाबदारी रेल्वेतील कामगारांची असते. मात्र त्यांच्याकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे आता रेल्वे विभाग अशा कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.