Lonavala Tourism: लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी! मात्र, पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी - लोणावळ्यात पर्यटकांना बंदी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे (लोणावळा) - लोणावळ्यात विकेंडच्या दिवशी हजारो पर्यटक दाखल होत आहेत. भुशी धरण, लायन्स लॉइन्ट, टायगर पॉईंट इथे नेहमी गर्दी होते. परंतु, हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. आज रविवार (दि. 17 जुलै)रोजी असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. मात्र, त्यांना पर्यटनस्थळी बंदी घालण्यात आल्याने पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. ( Lonavala Tourism ) भुशी धरणावर पर्यटकांअभावी शुकशुकाट आहे. लोणावळा पोलिसांनीही पर्यटकांना लोणावळ्यात न येण्याच आवाहन केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST