Building Collapse in Bhayandar East: भाईंदर पूर्वमध्ये इमारतीचा सज्जा कोसळून तिघेजण जखमी - इमारतीचा पहिल्या मजल्याचा सज्जा कोसळला
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : भाईंदर पूर्वेकडील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या नव कीर्ती इमारतीचा पहिल्या मजल्याचा सज्जा कोसळला. ही घटना आज घडली आहे. यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेत एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महानगरपालिका प्रशासनाचे अग्निशामक विभागाचे जवान पोहोचले आहेत. त्यांनी ढिगारा बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले की, महानगरपालिकेतर्फे ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे इमारतीत कोणीही राहत नव्हते. इमारतीखाली उभा असलेला एक रिक्षावाला आणि इतर दोन व्यक्तीही जखमी झालेले आहेत. ही इमारत लहान असल्यामुळे खुप मोठी दुर्घटना टळली, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.