Thane Lift Accident: बांधकाम व्यावसायिकाकडून लिफ्ट अपघात लपवण्याचा प्रयत्न- स्थानिकांचे गंभीर आरोप, पाहा व्हिडिओ - लिफ्ट दुरुस्तीत खोटेपणा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 10, 2023, 10:48 PM IST
ठाणे Thane Lift Accident : ठाण्यातील रुणवाल आयरीन या इमारतीच्या दुर्घटना प्रकारामध्ये ही संपूर्ण घटना लपवण्याचा प्रयत्न बांधकाम व्यवसायिक करत आहे, असा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाला देखील उशिरानं माहिती देण्यात आलीय. त्यासोबतच ठाणे पोलिसांना देखील उशिराने माहिती दिली. त्यामुळेच बचावकार्य उशिरानं सुरू झालं. हा संपूर्ण प्रकार सुरुवातीपासूनच लपवण्याचा प्रयत्न बांधकाम व्यवसाय करत होते. या कामगारांच्या जीवाचीदेखील पर्वा केलेली नाही. आता या संदर्भात स्थानिकांनी मृत परिवारांना मदतीची मागणी केलीय. या बांधकाम व्यावसायिकाचे या ठिकाणी आणि या परिसरात अनेक बांधकाम सुरू आहेत. यामध्ये सर्वच बांधकामांच्या ठिकाणी हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अवघ्या दोनच दिवसापूर्वी या बांधकाम साइटवर लिफ्ट दुरुस्तीचं सर्टिफिकेट (Lift Accident) लावण्यात आलेलं आहे. हे सर्टिफिकेटदेखील खोटं असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. या संदर्भात या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीदेखील स्थानिकांनी केलीय. लिफ्ट दुरुस्तीत खोटेपणा असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी संजय भोईर यांनी (MNS Leader Sanjay Bhoir) केलाय.