Maharashtra politics: सदाभाऊ खोत यांचा वापर करून सोडून दिले, सुषमा अंधारेंची भाजपवर टीका - Maha Prabodhan Yatra

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 21, 2023, 12:54 PM IST

बीड : बीडमध्ये शनिवारी ठाकरे गटाची महा प्रबोधन यात्रा पार पडली. त्यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. गोपीनाथ मुंडेनंतर भाजपची नैतिकता राहिली नाही, असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. भाजपने रासपचे महादेव जानकर यांचाही वापर करुन घेतला. त्यांचा वापर करुन टाकून दिले. त्यानंतर त्यांनी सदाभाऊ खोत यांना पुढे आणले होते. आता ते कुठे आहेत? सदाभाऊ खोत यांच्यशी संवाद साधला असता, ते म्हणतात भाजपने आपले आता काय ठेवले आहे. आता म्हशीचे दूध काढायचे आणि सोडून द्यायचे, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर हिंदुत्वावरून टीका केली. भाजपमध्ये नैतिकता नाही, हिंदु मुस्लिममध्ये फूट पाडण्याचे त्यांचे हिंदुत्व आहे. यासाठी ते दंगली घडवून आणतात, असा त्यांनी आरोप केला. आमचे ४० भाऊ भाजपच्या जाळ्यात अडकले आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाची  बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेनंतर झालेल्या सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण झाले.  

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.