Terrible Accident मुंबई पुणे महामार्गावर ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू - एमजीएम रुग्णालय
🎬 Watch Now: Feature Video
Terrible Accident मुंबईच्या दिशेने पुणे महामार्गावर चालक अजित जाधव (२५) इरली ता. कवठेमहांकाळ सांगली, हा ट्रेलर घेऊन जात होता. त्यावेळी त्या टेलरचे टायर फुटले, टायर फुटल्याने ट्रेलरचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने जवळून जाणाऱ्या टेम्पोला मागील डाव्या बाजूने धडक दिली. त्यानंतर बाजूने जात असलेल्या ट्रकला ठोकर मारली. त्यामुळे तो ट्रक विरुद्ध दिशेला वळला आणि उलटला आहे. नियंत्रण सुटलेल्या त्याच ट्रेलरने पुढे जाणाऱ्या आणखी एका ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने, तो ट्रक रस्त्याच्या कडेला असलेली लोखंडी रेलिंग तोडून सुमारे 100 फूट खोल दरीत पडला. तसेच त्याच्या मागोमाग नियंत्रण सुटलेला टेलरची देखील केबिन तुटून तीही 100 फूट खोल दरीत पडली. या अपघातात नियंत्रण सुटलेल्या टेलरचा चालक अजित जाधव हा गंभीर जखमी झाला होता व त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच दरीत पडलेल्या ट्रकचा चालक मंगळू हा ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला देवदूत टीम, आय आर बी पेट्रोलिंग, खोपोली पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी खूप प्रयत्न करून बाहेर काढले. ट्रक चालकही गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचाराकरिता नवी मुंबई परिसरातील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल MGM Hospital करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST