काय सांगता! तलाठी भरती परीक्षेत एकाला 200 पैकी चक्क 214 गुण; युवक कॉंग्रेसनं केला 'हा' मोठा आरोप

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

पुणे Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 पैकी चक्क 214 गुण मिळाले. आजवरच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केलाय. या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचंही रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटलंय. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं केलेल्या ट्वीटद्वारे ही माहिती समोर आलीय. एका विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत 54 गुण मिळाले आहेत. तर त्याच विद्यार्थ्याला तलाठी भरती परीक्षेत 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. सध्या राज्यातील कोणत्याही परीक्षा असो, परीक्षांमधील पारदर्शकता ही पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम शिंदे, फडणवीस, पवार सरकार करत असल्याची टीका पाटील यांनी केलीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.